राजकारण
Jitendra Awhad : महानंद आता गुजरातला विकलंय
महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे.
महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.
जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, मुद्दामहून रात्री ट्वीट करीत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या.. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा... आता हे काय नवीन सांगतो आहे, असं म्हणाल ! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकलेय !जय हो, महानंद की !