Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; कारण काय?
थोडक्यात
जितेंद्र आव्हाड यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती
निवडणुकांसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या भेटी वाढल्या
(Jitendra Awhad) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. राजकीय वर्तुळात अनेक भेटीगाठी होताना पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याची माहिती मिळत आहे.
यासोबतच प्रताप सरनाईक, प्रसाद लाड यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात बैठक झाली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता शरद पवार यांचा निरोप घेऊन जितेंद्र आव्हाड वर्षावर गेल्याची चर्चा रंगली आहे.
