K. Chandrashekar Rao : शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, आता काँग्रेस फुटण्याच्या मार्गावर

K. Chandrashekar Rao : शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, आता काँग्रेस फुटण्याच्या मार्गावर

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे कोल्हापुरात आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. त्याचे हे विधानावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले की, एनडीए किंवा इंडिया आघाडीत का गेला नाही? यावरही चंद्रशेखर राव यांनी भाष्य केलं. आम्ही तिसरी आघाडी म्हणून कार्य करत नाही. आम्ही इंडियाच्या बाजूनेही नाही आणि एनडीएच्या बाजूने पण नाही. पण लोकांना नवीन पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्या कामाची पद्धत बघून अनेक पक्षाने आमच्याशी संपर्क साधलेला आहे.

तसेच शरद पवार आम्हाला भारतीय जनता पार्टीची बी टीम समजत होते. आज त्यांच्या पक्षाची काय स्थिती झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रात शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, आता काँग्रेस ही फुटण्याच्या मार्गावर आहे. असे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com