बाळासाहेबांची शिवसेना...बाळासाहेब कोण? थोरात का विखे पाटील? पेडणेकरांचा टोला

बाळासाहेबांची शिवसेना...बाळासाहेब कोण? थोरात का विखे पाटील? पेडणेकरांचा टोला

ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे नाव व मशालीचे चिन्ह मिळाले आहे. यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
Published on

मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने नवे चिन्ह आणि नाव दिले आहे. ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे नाव व मशालीचे चिन्ह मिळाले आहे. यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला असून ठिकठिकाणी मशाल रॅली काढण्यात आली आहे. तर, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले व 'काळरात्र होता होता उष:काल झाला', अशी प्रतिक्रिया मशाल पेटवत दिली आहे

बाळासाहेबांची शिवसेना...बाळासाहेब कोण? थोरात का विखे पाटील? पेडणेकरांचा टोला
शिंदे गटाचा गोंधळ; एक, दोन नव्हेतर तब्बल सहा चिन्हे निवडणूक आयोगासमोर सादर

किशोरी पेडणेकर म्हणाले की, शेवटी नियतीनंच उत्तर दिले आहे. साल 1985 पासून शिवसेनेची मशाल धगधगतेय. इथं येऊन नतमस्तक होणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ही मशाल धगधगत होती. निवडणूक आयोगानं तात्पुरत का असेना पण दिलेलं नाव आणि चिन्ह हे अगदी समर्पक आहे. प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात चिंगारी धगधगत आहे. मुंबईत राष्ट्रपती लागवट लागू करा, मुंबईचे तुकडे करूयात, असे मनसूबे करणाऱ्यांचा हेतू कधीही साध्य होणार नाही, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. तर, 'काळरात्र होता होता उष:काल झाला', असं हे गाण आता म्हणावं लागेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

तर, बाळासाहेबांची शिवसेना...बाळासाहेब कोण? बाळासाहेब थोरात का?, विखे पाटलांची का?, शिर्केंची? असे बाळासाहेब अनेक आहेत. मात्र, बाळासाहेब ठाकरे एकच, त्यात ठाकरे येणं महत्वाचं आहे, असा टोलाही पेडणेकरांनी शिंदे गटाला लगावला आहे.

दरम्यान, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या नावाला निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. परंतु, शिंदे गटाची तिन्ही चिन्हे आयोगाने नाकारली. यानंतर आज नव्याने शिंदे गटाने तीन चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाला दिले आहेत. परंतु, शिंदे गटाने दोन ई-मेल निवडणूक पाठवत दोन्हीमध्ये वेगवेगळ्या चिन्हांचे पर्याय आयोगाला दिले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com