Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास खात्याच्या निधीवर डल्ला

हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता म्हणून दिला जाणार आहे.
Published by :
Shamal Sawant

लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळविण्यात आला आहे. हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता म्हणून दिला जाणार आहे.

बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करताना सरकारची दमछाक होऊ लागल्याने मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय व आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागतोय

आता आदिवासी विकास खात्यातून प्रत्येक महिन्याला असा निधी वळता केला जाणार असल्याचे समोर आले आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जमाती उपयोजनेसाठी 21 हजार 495 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या 3 हजार 420 कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातून मे महिन्यासाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com