Laxman Hake Wife : लक्ष्मण हाके यांच्या पत्नीची ऑडिओ क्लिप चर्चेत, धायगुडे यांच्या पत्नीशी शिवराळ संवाद
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजया हाके यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्या शिवराळ भाषेचा वापर करताना दिसतायत.ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके हे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका करत आहेत. ओबीसी समाजासाठी करण्यात आलेल्या तरतुदींनुसार निधी मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. या आरोपांनंतर लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगलं. अशातच आता लक्ष्मण हाके यांची पत्नी विजया हाके चर्चेत आल्या आहेत.
विजया हाके यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये त्या शिवराळ भाषेचा वापार करत आहेत. यामध्ये लक्ष्मण हाके यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्या धायगुडे यांच्या पत्नीशी त्या बोलत असल्याचा दावा करण्यात येतोय. लक्ष्मण हाके हे राखी सावंत आहे. पैसे आणि टीआरपीसाठी काहीही करायला तयार असतात अशा प्रकारची पोस्ट करण्यात आली होती. समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजया हाके या हनुमंत धायगुडे यांच्या पत्नी दिव्या धायगुडे यांच्याशी बोलत असल्याचा दावा केला जातोय. “तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय. तुमचे मिस्टर काहीतरी पोस्ट करत आहेत. हालकट मेला. त्यांना काय कमी पडलं होतं. मी त्यांच्या आलेल्या प्रत्येक नातेवाईकाला साडी घेतलेली आहे. प्रत्येक नातेवाईकाची उठाठेव केली आहे. माझं काय चुकलं गं. कुत्रा मेला. असाच तडफडून मरेल ना. माझं काय चुकलं हे सांग. तो असं का करतोय. माझ्या घरात रोज येऊन जेवत होता. मी स्वतःच्या कष्टावर सगळं करत आहे. ", असं ऐकायला मिळत आहे.