'...तर मुंबईत दोन-तीन लाख विनयभंगाचे गुन्हे दाखल होऊ शकतील'
मुंबई : मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडूनच महिलांवर अश्लील टिप्पणी केली जात आहे. यामुळे महिला खासदार आणि आमदारांमध्ये संतापाची लाट आहे. याप्रकरणी आज विरोधी पक्षातील महिला आमदार आणि खासदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे व यामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावं आणि अशा नेत्यांना अटकाव करावा, अशी मागणी महिला आमदार, खासदारांनी केली आहे.
या शिष्टमंडळात समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन, राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान, विद्या चव्हाण, आदिती तटकरे, आदिती नलावडे, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, ऋतुजा लटके, आमदार मनिषा कायंदे आदी महिला नेत्यांच्या समावेश होता. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
फौजिया खान म्हणाल्या की, महाराष्ट्रात महिलांविषयी अपमानास्पद बोलू लागले आहे. आमची वेदना आम्ही राज्यपाल यांच्याकडे मांडली. सरकारला बोलून जाब विचारला पाहिजे अशी मागणी केली. महिलांना संविधनिक संरक्षण दिले पाहिजे. राज्यपाल यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचे बोलले आहे. अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील सहीत अनेक नेत्यांची विषयी माहिती आम्ही दिली आहे. गृह खात एक्सप्लेटेशन केले आहे.
तर, जया बच्चन यांनी आम्ही महिला वरील अपमान प्रकरणी राष्ट्रपती यांची भेट घेणार आहे. आम्ही महिला अपमान सहन करणार नाही, असे सांगितले आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनीही माध्यमांशी संवाद साधत म्हणाल्या, अपमान करणारे भाष्य सहन केले जाणार नाही. महिला शक्तीला ताकद देण्यासाठी राज्यपालांनी कारवाई करावी. राज्यपाल यांचे पत्र सार्वजनिक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड प्रकरणात गृह मंत्री टारगेट करत आहे, असा आरोप त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.
विद्या चव्हाण म्हणाल्या की, विनयभंग होऊ शकत नाही या प्रकरणात मी कोर्टात जाणार आहे. असे गुन्हे दाखल झाले तर मुंबईत दोन-तीन लाख गुन्हे दाखल होऊ शकतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, काहीच दिवसांपुर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. याविरोधात राष्ट्रवादीकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली. तर, सत्तारांच्या घराची तोडफोडही करण्यात आली होती. यानंतर अखेर अब्दुल सत्तार यांनी खेद व्यक्त केला होता.