Uddhav Thackeray On Eknath shinde : "नाही तुमच्या छाताडावर भगवा रोवला तर...", उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना दम

उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना कडक इशारा
Published by :
Shamal Sawant

आज शिवसेनाचा 59 वा वर्धापन दिन पार पडला. वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याबद्दल भाष्य केले आहे. याचवेळी त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणता मग तुम्ही काय सोडलं? मशिदीमध्ये जाऊन सौगाता वाटता. नक्की काय म्हणायचं? संपूर्ण कुटुंबाला बदनाम करायचं, भाजपाने अनेक धमक्या दिल्या. 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा तरीही त्यांना तुम्ही भाव देताय. तुम्ही शिवसेना संपवण्याचं स्वप्न बघत आहात, पण शिवसेना तुम्हाला संपवून तुमच्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना संपवून नाही तुमच्या छाताडावर भगवा रोवला तर नाव नाही सांगणार".

पुढे ते म्हणाले की, "आता आपल्याला भांडून चालणार नाही. भाजपने भांडण लावून दिलं. पण आता मुंबईमध्ये हिंदू-हिंदूमध्ये मारामाऱ्या लावण्याचं काम सुरू केलं आहे".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com