Sanjay Raut: "राज्यात मविआ 170 ते 175 जागा जिंकेल" संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
नक्कीच काल नांदेडवरुन निघालो आणि सोलापूरमध्ये पोहोचलो. नांदेडपासून सोलापूरपर्यंत अनेक कार्यक्रम, मेळावा झाले आणि सोलापूरचं म्हणाल तर सोलापूरची तयारी पक्की आहे आणि दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेने अनेकदा जिंकलेली जागा आहे. महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र बसून त्या चर्चा करत आहोत. त्या चर्चेमध्ये दक्षिण सोलापूरचा विषय जेव्हा येईल तेव्हा नक्कीच त्याच्यावर चर्चा होईल पण तोपर्यंत आम्ही आमच्या अनेक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्ष ही तयारी करतो. आमच्या कार्यकर्त्यांना, संभाव्य उमेदवारांना कामाला लागा हे सांगायला हरकत नसते आणि ही जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि ते शिवसेनेचे आमदार असावं ह् आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. राज्यातील चित्र म्हणाल तर राज्यामधील चित्र काय आहे हे आपण सगळे जाणता आम्ही किमान 170 ते 175 जागा महाविकास आघाडी त्यांचे घटक पक्ष म्हणून जिंकू याबाबत कोणाच्याही मनात शंका असण्याची कारण नाही. अगदी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे सुद्धा खाजगीत हाच आकडा देतील. राज्यातलं वातावरण हे फक्त महाविकास आघाडीसाठीच अनुकूल आहे असे संजय राऊत म्हणाले.
जेव्हा जागावाटप जाहीर होईल तेव्हा तुमची माहिती चुकीची आहे ज्यानी दिलेली आहे ते सिद्ध होईल. घाटकोपर हा तर शिवसेनेचा कायमस्वरुपी हा लढण्याची जागा राहिलेली आहे. बोरीवलीमध्ये आम्ही लोकसभा लढलेलो आहेत आता इतर कोणत्या जागा मला माहित नाही. कोणतीही जागा ही महायुतीसाठी अजिंक्य नाही हे लक्षात घ्या. प्रत्येक जागेवर आव्हान आहे आणि मुंबईचं वातावरण सुद्धा महाविकास आघाडीसाठीच अनुकूल आहे आणि जे चित्र लोकसभेत होतं तेच चित्र मुंबईच्या बाबतीत तुम्हाला विधानसभेत किंबहूना जास्त जागा आम्ही जिंकून देऊ असे संजय राऊत म्हणाले.
या गुपचूप उरकण्याला काही अर्थ नसतो. धारावीच्या जनतेचा नव्हे तर संपूर्ण मुंबईतल्या जनतेचा या अडाणी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध आहे. हा धारावी पुनर्विकास प्रकल्प नाही आहे, हा नरेंद्र मोदींचे लाडके मित्र गौतम अडाणी यांचा पुनर्विकास प्रकल्प आहे संपूर्ण देशचं त्यांना दिलेला आहे. जिथे जमीन मोकळी दिसली तिथे अडाणीचा बोर्ड लागतो. पण धारावी हा नुसता जमीनीचा तुकडा नाही आहे ही मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा भूखंड आहे. लाखो लोकांच्या घराच्या रोजगाराचा प्रश्न तिथे येतो आणि धारावीच्या निमित्ताने संपूर्ण मुंबई अडाणीच्या घशात घालण्याचा हा घाव मुंबईतील मीठाघर मुंबईतल्या मोक्याच्या जमीनी, मुंबईतील मदर डेरी सारखी जागा ही धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अडाणीला दिली जात असेल तर संपूर्ण मुंबई या अडाणीच्या प्रकल्पविरुद्ध रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही आणि स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी असतील किंवा त्या भागातल्या काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड असतील सगळ्यांनी तीच भूमिका आहे असे संजय राऊत म्हणाले.