Marathwada Cabinet: मराठवाड्यातून पाच मंत्रिपदे राज्य मंत्रिमंडळात, जाणून घ्या यांची नावे

Marathwada Cabinet: मराठवाड्यातून पाच मंत्रिपदे राज्य मंत्रिमंडळात, जाणून घ्या यांची नावे

मराठवाड्यातून पाच मंत्रिपदे राज्य मंत्रिमंडळात, जाणून घ्या यांची नावे आणि कोणत्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ही झाला. नुकतीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आठवडा उलटला. मात्र, राज्य खातेवाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं होतं. अखेर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे. अपेक्षेनुसार गृहमंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात आलं आहे. तर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ मंत्रायलयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृह निर्माण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर पंकजा मुंडे यांना पर्यावरण मंत्रालय देण्यात आलं आहे. मराठवाड्याच्या पडरात पाच मंत्रिमंडळातील जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून पाच मंत्रिपदे मिळाली आहेत

मराठवाड्यातील पाच मंत्रिपदे

पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण

संजय शिरसाट – सामाजिक न्याय विभागाच्या

मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com