MVA Sabha In Chhatrapti SambhajinagarTeam Lokshahi
राजकारण
छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मविआच्या 'वज्रमुठ' सभेचा टीझर प्रदर्शित
उद्या 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्रित सभा होणार आहे.
राज्यात सध्या राजकीय घडामोडी सुरू असताना दुसरीकडे सत्तांतरापासून मविआच्या नेत्यांवर सातत्याने आरोप होत आहेत. त्यातच तपास यंत्रणांच्या माध्यमातून होणारी कारवाई, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध मुद्दयांवर राज्यसरकारला घेरण्यासाठी मविआने चांगलीच तयारी केली आहे. त्याआधी उद्या 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्रित सभा होणार आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या ठिकाणी महाविकास आघाडीची ही वज्रमूठ सभा पार पडणार आहे. याच सभेचा आता तिसरा टीझर जारी करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा टीझर आपल्या ट्विटरवरून प्रदर्शित केला आहे.