पीएफआय धाडसत्रावर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया म्हणाले, पीएफआयईवर केली गेलेली कारवाई गुप्त...
देशात सध्या पाॅप्युलर फ्रंट आॅफ इंडिया (PFI) हे प्रचंड चर्चेत येत आहे. त्याचे कारण असे की, पाॅप्युलर फ्रंट आॅफ इंडिया अर्थात पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर धाडी टाकत एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी शेकडो तरुणांना अटक केली आहे. त्यानंतर आज सकाळी पुन्हा ७ विविध राज्यांमध्ये पोलिसांनी छापे टाकले. या दरम्यान जवळपास १७० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या धाड सत्रावर केंद्राकडून मोठा दहशतवादी कट उधळल्याचा दावा केला जात आहे. या कारवाईनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी मुस्लिम संघटना रस्त्यावर उतरल्या असताना, त्यावरच आता एमआयएमने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एटीएस किंवा केंद्रीय तपास यंत्रणांकडे दहशतवादी कारवायासंदर्भात काही पुरावे असतील तर त्यांनी निश्चितच कारवाई करावी, त्याला आम्हीच काय कुठलाच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना किंवा व्यक्तीगत विरोध करण्याचे कारण नाही. शेवटी पीएफआयईवर केली गेलीली कारवाई गुप्त आहे, कुणालाच माहित नाही. परंतु केंद्रीय तपास यंत्रणेतील एखाद्या अधिकाऱ्याला वाटले म्हणून कारवाई, अटक केली जाऊ नये, असे मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
परंतु पुराव्याशिवाय जर अशी कारवाई होत असेल, तरुणांना उचलले जात असले तर ते देखील चुकीचे आहे. कारण यापुर्वी दहशतवादाशी संबंधित व्यक्ती म्हणून झालेल्या कारवायांमध्ये दहा दहा वर्ष तरुणांना तुरुगांत डांबून ठेवण्यात आले होते. नंतर न्यायालयाने ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे. असे वारंवार घडू नये एवढीच या निमित्ताने अपेक्षा आहे.
पुढे ते म्हणाले की, अटक झालेल्यांचे कुटुंब आमच्याकडे येत आहेत, त्यांना आम्ही सांगतो आहोत,की तुमचा मुलगा निर्दोष असेल तर त्याची लवकरच सुटका होईल, पण दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होईलच, असे आम्ही त्यांना सांगत आहोत. अशी प्रतिक्रिया यावेळी जलील यांनी केले.