Raj Thackeray : राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची बैठक संपली; पदाधिकाऱ्यांना दिले 'हे' आदेश
थोडक्यात
राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची बैठक संपली
1 नोव्हेंबरच्या मोर्चात मतदारांचा रोष दिसू द्या
राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
(Raj Thackeray) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे बैठक पार पडली. या बैठकीत मतदार यादी व इतर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना काही आदेश दिल्याचे समजते.
1 नोव्हेंबरच्या मोर्चात मतदारांचा रोष दिसू द्या, असे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक आयोगाचा कारभार तरूणांसमोर पारदर्शकपणे मांडा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत लोकांशी उघडपणे बोला,
तसेच लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या चुका, यादीतील घोळ, कार्यप्रणालीतील राजकीय हस्तक्षेप या सर्व गोष्टींबाबत पुरावे जमा करून लोकांशी बोला असे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळत आहे.
निवडणूक आयोगाची चुकीची कार्यप्रणाली प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. असे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
