Vikram Gokhale | Amol Kolhe Team Lokshahi
राजकारण
विक्रमकाका, तुमची उणीव भासत राहील!..., खासदार कोल्हेंची भावनिक पोस्ट
विक्रम गोखले यांच्या निधनाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवरही शोककळा
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवरही शोककळा पसरली आहे. सर्वच स्थरावरून अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस खासदार अमोल कोल्हे यांनी यांनी भावनिक पोस्ट केली आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे.
अमोल कोल्हे यांची पोस्ट?
विक्रमकाका, तुमची उणीव भासत राहील!
जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता
कॅमेराला डबल लूक देईल ,
जेव्हा जेव्हा फक्त देहबोलीतून
पानभर संवाद बोलला जाईल
जेव्हा जेव्हा घेतलेल्या पाॅज मधूनही
अचूक अर्थ पोहोचवला जाईल
जेव्हा जेव्हा एन्ट्रीच्या थाटावरून
पात्राची पूर्ण पार्श्वभूमी उभी राहील
अशी भावनिक पोस्ट खासदार कोल्हे यांनी शेअर केली आहे.