Mumbai Budget 2025: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 'या' दिवशी होणार सादर
आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून आज केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील, आणि उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ज्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. तर आजपासून म्हणजेच 31 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा टप्पा पार पाडला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्या टप्प्यात महागाई, बेरोजगारी तसेच आर्थिक मुद्द्यांवर विरोधकांकडून मांडणी केली जाते. त्याचसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि वक्फ विधेयक प्रश्नावरही विरोधकांकडून केंद्र सरकार प्रश्नांची कोंडी केली जाऊ शकते.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 'या' दिवशी होणार सादर
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमिवर आता मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत एक महत्त्व बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला सादर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प आयुक्त आणि प्रशासक म्हणून भूषण गगरानी पहिल्यांदाच सादर करणार आहेत.
तसेच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यावरण, प्रदूषण आणि बेस्ट या मुद्द्यांना हात घातला जाईल तसेच यासाठी योग्य ती उपाययोजना आखण्याची शक्यता वर्तविण्यात जात आहे. तसेच देवनार डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करण्यासाठी साधारण सात ते आठ वर्ष लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. तर यंदाचा अर्थसंकल्प 65 हजार कोटींचा आकडा ओलांडणार असल्याची शक्यता आहे.