भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर; नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया

काँग्रेस कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांचे पोस्टर्स नागपूर शहरांमध्ये लावलेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

कल्पना नळसकर | नागपूर : काँग्रेस कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांचे पोस्टर्स नागपूर शहरांमध्ये लावलेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ही कार्यकर्त्यांची भावना आहे ती त्यांनी पोस्टर रूपाने व्यक्त केलेली आहे, असा पटोलेंनी म्हंटले आहे. काँग्रेस पक्ष यावेळेस निवडणुकांमध्ये जास्त जागा निवडून येईल, अशी आशा देखील व्यक्त केलेली आहे.

कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. आमची भूमिका त्या स्पष्ट आहे. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. या पद्धतीचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावू नये माझ्या कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून सांगतो आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

निवडणुका स्वबळावर लढणार का? असा प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले, काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूकीत नेते तयार होतात. यातून प्रयत्न केला जाईल. आम्ही मागून वार करणार नाही, आम्ही सांगून करू, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com