Nana Patole
Nana Patole Team Lokshahi

पावणेदोनशे जागा काँग्रेसनं जिंकल्या, नाना पटोलेंची माहीती

खोटी माहिती देऊन भाजपचा स्वतःची पाठ थोपाटून घेण्याचा प्रयत्न
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात राजकीय गोंधळा दरम्यान काल ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला. यात भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारल्याची दिसून आले. त्यानंतर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षानं जास्तीत-जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे.

Nana Patole
तुम्ही केलेल्या अभद्र युतीच्या विरोधात आमचा उठाव, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

काय म्हणाले नाना पटोले?

ग्रामपंचायत निकालावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, आमच्या पक्षानं जास्तीत-जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला जात आहे. पावणेदोनशे जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत.माध्यमांना खोटी माहिती देऊन भाजप स्वतःची पाठ थोपाटून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावनिहाय आकडे लवकरच जाहीर करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मी तुमच्या वाढदिवशी आत्महत्या करतो. यानंतर तरी तुम्ही लक्षात ठेवाल, असे त्या शेतकऱ्यांनी चिठ्ठीत लिहले होते. असे बोलताना पटोले यांनी विधान केले.

Nana Patole
चित्ता आणि पेंग्विनवरून अजित पवार,बावनकुळेंमध्ये जुंपली

राज्यात पावसामुळे धान, कांदा, कापूस, सोयाबीन अशी बरीच पिकं उद्धस्त झाली. शेतकरी देशोधडीला निघाला. पण, अद्याप मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. तीन हजार कोटी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याचं राज्य सरकारनं अधिवेशनात जाहीर केले. शेतकऱ्यांना आधार मिळेल, असं वाटत होत. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांना अद्याप पैसे आले नसल्याचे सांगता आहे. असे खोटारडी काम राज्यात ईडीचे भाजप सरकार करत आहे, अशी जोरदार टीका पटोले यांनी राज्यसरकारवर केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com