महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर; नाना पटोले म्हणाले...
हिवाळी अधिवेनशन पार पडलं त्यानंतर राज्य खातेवाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं होतं. अखेर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यामध्ये गृहमंत्रालय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात आलं आहे. तर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ मंत्रायलयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृह निर्माणखात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नाना पटोले म्हणाले की, महायुतीची परिस्थिती आता कौरवांसारखी आहे. हे आपसातच लढू आता यांचा कार्यक्रम संपणार आहे. कारण मलईदार जिल्हे, मलईदार खाते याचीही लढाई लांब चालली. यांची आता पालकमंत्रिपदासाठी भांडणं होणार.
विधासभेच्या अधिवेशनामध्ये साधं मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओसुद्धा मंत्र्यांना देऊ शकले नाहीत. जनतेच्या प्रश्नाचं घेणंदेणं नाही. असं हे सरकार महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. असे नाना पटोले म्हणाले.