Narayan Rane
Narayan Rane

Narayan Rane : 'सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे...'; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्याची घोषणा केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Narayan Rane ) राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्याची घोषणा केली आहे. ही विजयी सभा 5 तारखेला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता नारायण राणे यांनी ट्विट करत टीका केली आहे.

नारायण राणे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे याचे मराठीचे प्रेम बेगडी, राजकीय व स्वार्थापोटी आहे. मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेले होते ? मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले ?मराठीच्या नावावर केवळ आपले कल्याण करून घेतले. मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय ?'

यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८ टक्केपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण ? मराठी बद्दल इतकेच प्रेम होते तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले ? सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल.' असे नारायण राणे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com