Mama Rajwade
राजकारण
Mama Rajwade : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; सहा दिवसांपूर्वी महानगरप्रमुख झालेले मामा राजवाडे भाजपामध्ये प्रवेश करणार
नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.
(Mama Rajwade ) नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. सहा दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना महानगरप्रमुख पदी नियुक्ती केलेले मामा राजवाडे आज भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
विलास शिंदे यांच्या जागी मामा राजवाडे यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख पद दिले होते. सहा दिवसानंतर मामा राजवाडे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
आज मामा राजवाडे, सुनील बागुल, सीमा ताजने, प्रशांत दिवे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मामा राजवाडे यांच्याविरोधात नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात मारहाणीसह दरोड्याचा गुन्हा दाखल होता.