देशमुखांच्या सुटकेनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, राज्यकर्त्यांना काही सद्बुद्धी...
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी कारागृहातुन सुटका झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. अनिल देशमुख कारागृहातून बाहेर आले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी राष्ट्रवादीचे मोठे नेते उपस्थित होते. याच सुटकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
अनिल देशमुखांच्या सुटकेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, आज जो काही कोर्टाचा निकाल लागला. तो निकाल राज्यकर्त्यांना काही सद्बुद्धी असली तर विचार करण्याला मदत करणारा उपयुक्त ठरणार आहे. कोर्टाने सांगितलं आहे की, जी व्यक्ती जिच्यावरचा पहिला आरोप होता की त्यांनी १०० कोर्टीचा अपहार केला, नंतर जो चार्जशीट दिल त्यात १०० आकडा नव्हता तर ४ कोटी होता आणि अंतिम आकडा १ कोटींचा अपहार झाला असा दिला. त्यामुळे कोर्टाने स्पष्ट सांगितलं कोणताही गैरव्यहार झाला नाही. असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करून कारण नसताना एका सुसंस्कृत आणि कर्तृत्वान व्यक्तीला जवळपास १३ महिने तुरुंगात डांबून ठेवले. मात्र, एका समाधानाची गोष्ट आहे की शेवटी न्यायदेवतेने न्याय दिला. परंतु, ही स्थिती ज्यांनी निर्माण केली त्या सगळ्यांचा विचार गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी केला पाहिजे. विशषेतः हे जे निर्णय ज्यांनी घेतले ज्या काही यंत्रणा आहेत त्यांच्याबद्दल अधिक माहिती एकत्रित करून संसदेतील माझे काही सहकारी मिळून गृहमंत्री आणि यांच्याशी बोलणार आहे. असे शरद पवार यावेळी म्हणाले.