Rupali Thombare Patil
Rupali Thombare Patil

Rupali Thombare Patil : रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस; कारण काय?

पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षावर टीका केल्यानं कारणे दाखवा नोटीस
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • रूपाली ठोंबरे पाटील यांना पक्षांतर्गत वाद भोवण्याची शक्यता

  • पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षावर टीका केल्यानं कारणे दाखवा नोटीस

  • 7 दिवसात खुलासा करण्याची मागणी

(Rupali Thombare Patil) रूपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून नोटीस बजावण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. आपल्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई का करु नये, सात दिवसांत यावर खुलासा द्यावा नाहीतर आपल्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असे

या नोटीसमध्ये म्हटलं आहे. पक्षाच्या प्रवक्त्या असताना पक्षाच्याच महिला प्रदेशाध्यक्षांविरोधात माध्यमांमध्ये वक्तव्य केल्यानं शिस्त भंगाची कारवाई करत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत असून राज्य महिला आयोगाविरोधात माध्यमांमध्ये केलेली वक्तव्य पक्षशिस्त भंग करणारे असल्याचा बोलले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com