Rupali Thombre
Rupali ThombreTeam Lokshahi

सुषमा अंधारेंच्या पाळीव कुत्र्याला पण शिंदे गट पक्षात घेतील, रुपाली ठोंबरेंचा टोला

दीपाली सय्यद यांचं ना घर काना घाट का असं झालं आहे. त्यामुळे शिंदे गटात जाण्याचा जो केविलवाना प्रयत्न आहे.
Published on

राज्यात प्रचंड राजकीय गदारोळ सुरु असताना, अशातच शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात प्रवेश करणार असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावरूनच राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटावर टीका करताना त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या दीपाली सय्यद यांना देखील धारेवर धरले आहे.

Rupali Thombre
आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या रिधा रशीद म्हणाल्या, मला दोन्ही हाताने...

शिंदे गटाला टोला

सुषमा अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात प्रवेश करणार यावर माध्यमांशी बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, सुषमा अंधारे यांच्याकडे जर पाळीव कुत्रा असेल तर तेही बघितलं पाहिजे. कारण तेही शिंदे गटात घेतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे. व्यक्तिगत आयुष्य राजकारणात आणू नये पण सुषमा अंधारे शिंदे गटाला धारेवर धरत असल्यानेच त्यांच्या विभक्त पतीला त्यांनी पक्षप्रवेश दिला असल्याचे म्हटले आहे. असे ठोंबरे यावेळी म्हणाल्या.

दीपाली सय्यद ना घर का ना घाट का

दीपाली सय्यद यांचं ना घर काना घाट का असं झालं आहे. त्यामुळे शिंदे गटात जाण्याचा जो केविलवाना प्रयत्न आहे. आणि ही त्यांच्या कर्माची फळं असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. भाजप प्रत्येक वेळी जादूटोणा, धर्म यावर भाष्य करत असतात त्यामुळे मी ही म्हणेल की दीपाली सय्यद यांच्या ही पापाची फळे आहेत. असं म्हणत त्यांनी दीपाली सय्यद यांच्यावर निशाणा साधला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com