Supriya Sule | Abdul Sattar
Supriya Sule | Abdul SattarTeam Lokshahi

सत्तारांच्या बारामती दौऱ्यावर सुप्रिया सुळेंचे भाष्य; म्हणाले, संस्कार...

अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड मतदारसंघात एका कार्यक्रमा निमित्त बोलत असतांना सुप्रिया सुळे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती.
Published by :
Sagar Pradhan
Published on

काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषिमंत्री शिंदे गट नेते अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानांचा राष्ट्रवादीकडून प्रचंड निषेध नोंदवला गेला होता. त्यानंतर आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज बारामतीत आयोजित कृषी प्रदर्शनाला हजेरी लावली. यावरच सुप्रिया सुळेंनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule | Abdul Sattar
PM Modi : मेट्रो स्टेशनबाहेर पोलिसांकडून नागरिकांवर लाठीचार्ज

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मंत्री अब्दुल सत्तार आज बारामतीमध्ये होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांना या संदर्भात पत्रकारांकडून विचारले असता. त्या म्हणाल्या की, बारामती कुणीही आले तरी त्यांचे स्वागतच आहे. अतिथी देवो भव हे आमच्यावर संस्कार आहेत. त्यामुळे जे कोणी येतील त्यांचे आम्ही स्वागतच करू, अशा मोजक्या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.

अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड मतदारसंघात एका कार्यक्रमा निमित्त बोलत असतांना सुप्रिया सुळे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्यानंतर राज्यभरात सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. सत्तारांचा राजीनामा घ्या, या मागणीसाठी अगदी मुंबईत सत्तारांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या महिलांनी आंदोलन केले होते.

तर दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार हे कृषी प्रदर्शनात पवार कुटुंबाचे कौतुक करताना दिसून आले. कृषी प्रदर्शनात पवार कुटुंबियांचे कौतुक करत ते राबवत असलेल्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होईल, असे मतसत्तारांनी यावेळी व्यक्त केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com