Amol Mitkari | Ravi Rana
Amol Mitkari | Ravi RanaTeam Lokshahi

अजित पवारांबाबत केलेल्या राणांच्या 'त्या' दाव्यावर मिटकरींचा पलटवार; म्हणाले, पाप...

रवी राणा यांनी मनातले मांडे मोडू नये.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना अशातच काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार हे नाराज असल्याचे वृत्त समोर येत होते. त्यातच राजकीय मंडळींकडून देखील या मुद्द्यावरून वेगवेगळे दावे करण्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठा दावा केला होता. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी राणांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Amol Mitkari | Ravi Rana
"राज्यात लवकरच ऑपरेशन कमळ" पृथ्वीराज चव्हाण यांचा लोकशाही मराठीवर खळबळजनक दावा

काय दिले मिटकरींनी राणांना प्रत्युत्तर?

अजित पवार हे भाजप सोबत जाणार आहे असा दावा आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, अजित पवार हे मुंबईच देवगिरी बंगल्यावर आहे दादा कुठं गेले नाही. त्यामुळे रवी राणा यांनी मनातले मांडे मोडू नये. दादा भाजप मध्ये जाणार नसून राष्ट्रवादी हे भाजप सोबत जाण्याच पाप कधीच करणार नाही अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.

काय म्हणाले होते रवी राणा?

शरद पवार आणि मोदींचे काय संबंध आहे हे महाराष्ट्राताला माहिती आहे, दोघेही एकमेकांचा सन्मान करता, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सिल्वर ओक वर जाऊन शरद पवार यांचे पाय पकडले. हे महाराष्ट्रानं पाहिलं, जेव्हा शरद पवार यांनी एक वक्तव्य केले तर उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांचे पाय पकडावे लागले त्यांना माहीत आहे. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरील हात काढला तर उद्धव ठाकरे सोबत दोन आमदार सुद्धा राहणार नाही. जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी ,अमित शहा हिरवा कंदील देतील, तेव्हा अजित पवार हे भाजप सोबत जातील देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांचा हिरवा कंदील केव्हाही देऊ शकते तेव्हा अजित पवार पुन्हा नॉट रीचेबल होतील. असा दावा राणांनी केला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com