उध्दव ठाकरेंची स्थिती पिसाळलेल्या कुत्र्यासारखी; निलेश राणेंची टीका

उध्दव ठाकरेंची स्थिती पिसाळलेल्या कुत्र्यासारखी; निलेश राणेंची टीका

निलेश राणे यांनी उध्दव ठाकरेंवर डागले टीकास्त्र
Published on

सिंधुदुर्ग : भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरेंची स्थिती पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाल्याची जोरदार टीका निलेश राणे यांनी केली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलत होते.

निलेश राणे म्हणाले की, ठाकरेंना चांगली भाषा कळत नाही. त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे. ठाकरेंची स्थिती पिसाळलेल्या कुत्र्यागत झाली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं हे मला वेगळं सांगायची गरज नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यामुळे हे आता चांगल्या भाषेतून ऐकणार नाहीत. यांना फटकेच घातले पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्या भाषणापासून सांगतायेत आमचा संयम तोडू नका. पण जर यांना संयम तोडायचा असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच, अशा इशाराच राणेंनी उध्दव ठाकरेंना दिला आहे.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठात दुपारी ३ वाजता संतोष बांगर दर्शनाकरीता आल्याची कुणकूण तालुक्यातील शिवसैनिकांना लागली आणि शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनीक लाला चौकात गोळा झाले. सहा वाजेच्या दरम्यान आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडला व शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओकेचे नारे देत त्यांच्या गाडीवर हाता-बुक्यांनी मारत नारेबाजी केली. यावेळी आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही नेमके काय झाले समजले नाही. सदर घटनेने काही वेळ लाला चौकात तणाव निर्माण झाला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com