Nilesh Rane| Uddhav Thackeray
Nilesh Rane| Uddhav ThackerayTeam Lokshahis

मीनाताई ठाकरेंच्या मृत्यूवर निलेश राणेंचा प्रश्न? म्हणाले, कर्जतच्या फार्म हाऊस वर काय झालं?

ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा मर्डर करण्यात आला का?
Published on

राणे कुटुंब आणि शिवसेना असा वाद नेहमी पाहायला मिळतो. मात्र, या वादात एकमेकांवर गंभीर आरोप- प्रत्यारोप केले जातात. अशातच आता भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाविषयी गंभीर आरोप केले आहेत. निलेश राणे यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या ट्विट मोठा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

Nilesh Rane| Uddhav Thackeray
स्वतःची नाती ठेवायची झाकून, बाळासाहेबांच्या घराण्याकडे पाहायचं वाकून, पेडणेकर यांची शिंदे गटावर विखारी टीका

राणे म्हणाले की, “ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा मर्डर करण्यात आला का? स्वर्गीय मीना साहेब (माँसाहेब) ठाकरे ज्या दिवशी गेल्या त्या कशा गेल्या, कुठल्या परिस्थितीत गेल्या, कर्जतच्या फार्म हाऊस वर काय झालं हे देखील महाराष्ट्राला एकदा कळलं पाहिजे. असं खळबळजनक ट्वीट त्यांनी केले आहे.

निलेश राणेंच्या या ट्वीटमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. निलेश राणेंनी थेट बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी आणि उद्धव ठाकरेंच्या आई मीनाताई ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तसेच आता या ट्वीटमधली सुंदर व्यक्ती कोण? अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com