Nitesh Rane
राजकारण
Nitesh Rane : "कुठलंही वक्तव्य जबाबदारीने करायला हवं"; नितेश राणेंचा निलेश राणेंना सल्ला
निलेश राणे यांनी रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nitesh Rane) निलेश राणे यांनी रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांच्या वक्तव्यावर त्यांचे भाऊ नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे म्हणाले की, "कुठलही वक्तव्य जबाबदारीने केलं पाहिजे. रवी चव्हाण साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब असतील. या सगळ्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अतिशय उत्तम असा संवाद आहे."
"आम्ही सर्वजण कुणीही अशा पद्धतीचे वक्तव्य करुन महायुती सरकारला गालबोट लागणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे." असे नितेश राणे म्हणाले.
Summery
भावाला भावाचा सल्ला
'कुठलंही वक्तव्य जबाबदारीने करायला हवं'
मंत्री नितेश राणेंचा निलेश राणेंना सल्ला
