Vasai-Virar : वसई विरार येथे बविआला मोठा धक्का! नितीन भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

Vasai-Virar : वसई विरार येथे बविआला मोठा धक्का! नितीन भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

महापालिका निवडणुकीत महायुतीचा जोरदार प्रारंभ, वसई विरारमध्ये बविआचे कार्यकर्ते भाजपात सामील
Published by :
Prachi Nate
Published on

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे निकालाने अनेकांच्या भूवया उंचावल्या. विधानसभा निवडणूकीच्या निकालात महायुतीचं सरकार सत्तेत आलं. ज्यामुळे महापालिका निवाणुकीच्या सुरुवातीलाच अनेक विरोधी पक्षाला महायुतीचा धक्का लागलेला आहे. विरोधीपक्षातून अनेक आमदारांनी महायुतीत प्रवेश केला आहे. याचाच आणखी एक धक्का वसई विरार नालासोपारा याठिकाणी पाहायला मिळत आहे.

वसई विरार नालासोपारा परिसरात भाजपाने महापालिका निवाणुकीचे रणशिंग फुंकले आहे. बहुजन विकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या प्रमुख उपस्थित भाजपात पक्ष प्रवेश केला आहे. वसई पूर्वेच्या राजिवली डांबर कंपाउंड येथील बहुजन विकास आघाडीचे नितीन भोईर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला आहे.

याचपार्श्वभूमिवर स्नेहा दुबे म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आणि वसई तालुक्यामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे. ते सगळ पाहता आणि आज नितीन भोईर यांनी मोठा पक्षप्रवेश इथे केलेला आहे. त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्यांच सगळ्यांच मी स्वागत करते. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे ते ज्या आशेने आले आहेत की, लोकांची काम झाली पाहिजे. इतके वर्षोनवर्ष प्रलंबित राहिलेले जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत. त्यांना पाठबळ देऊन इथले जे स्थानिक प्रश्न जे आहेत ते आम्ही सोडवण्याचा नक्की प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया स्नेहा दुबे यांनी दिली आहे".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com