Nitin Gadkari : भाजपच्या इनकमिंगवरुन गडकरींनी टोचले नेत्यांचे कान, म्हणाले...
थोडक्यात
भाजपच्या इनकमिंगवरुन गडकरींनी टोचले नेत्यांचे कान
'जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अन्यथा...'
'जितक्या जोरात वाढले, तितक्याच जोरात खाली येणार'
(Nitin Gadkari) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच भाजपमध्ये इनकमिंग सुरू असून या इनकमिंगवर भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कळमेश्वर येथील विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. नितीन गडकरी यांनी भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगवरुन नेत्यांचे कान टोचले आहेत. "जुना कार्यकर्ता हा घरकी मुर्गी दाल बराबर तर बाहेरचा सावजी चिकन मसाला चांगला लागतो. जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा."
"जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालले आहात, तेवढ्याच जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा." असे नितीन गडकरी म्हणाले. गडकरींच्या या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
