राजकारण
इंडिया आघाडीची 5 नोव्हेंबरची सभा पुढे ढकलली?
इंडिया आघाडीची 5 नोव्हेंबरला नागपुरात होणारी सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
इंडिया आघाडीची 5 नोव्हेंबरला नागपुरात होणारी सभा पुढे ढकलण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधक एकवटले आहेत. I.N.D.I.A. आघाडीच्या याआधीच्या सभा पाटणा, बंगळुरू आणि मुंबईत तीन बैठका घेतल्या आहेत.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना सभा पुढं ढकलण्याची मागणी केल्यामुळे वरिष्ठांनी निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते आहे. राज्यात 5 नोव्हेंबरला ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान असल्याने इंडिया आघाडीच्या सभेची तारीख पुढं ढकलल्याची सूत्रांची माहिती आहे.