राजकारण
EVM संदर्भातील खासदार सुप्रिया सुळेंच्या विधानावर अशोक चव्हाण म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत होत्या.
यातच EVMवर बोलताना खासदार सुप्रीया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं की, 'ठोस माहितीशिवाय ईव्हीएमला दोष देणार नाही'. तर यासोबतच युगेंद्र पवार यांनी देखील फेरमतमोजणीसाठी जो अर्ज केला होता तो देखील मागे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान त्यांच्या वक्तव्यावरुन अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले की, देर आए दुरुस्त आए असे म्हणावे लागेल. उशिरा का होईना त्यांना शहाणपण सुचलं.