Devendra Fadnavis | Pankaja Munde
Devendra Fadnavis | Pankaja MundeTeam Lokshahi

गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमास फडणवीस राहणार हजर; पंकजा मुंडेंची मात्र पाठ, चर्चांना उधाण

गहिनीनाथ गडावरील पंकजा मंडेंचा दौरा रद्द; अनेक वर्षांत पहिल्यांदाच मुंडेंच्या दौऱ्यात खंड
Published on

बीड : संत वामन भाऊ यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती लावणार आहेत. या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांनी मात्र फिरवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नाराजीच्या चर्चेला उधाण आले आहे.

Devendra Fadnavis | Pankaja Munde
रामदास कदमांच्या ‘त्या’ विधानानंतर सुषमा अंधारे आक्रमक; म्हणाल्या, बाईचा पदर...

बीडच्या आष्टी तालुक्यातील गहिनीनाथ गडावर आज संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे. मागील 15 दिवसांमधील फडणवीसांचा हा दुसरा बीड दौरा आहे. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात फडणवीसांचं विशेष लक्ष असल्याचं यातून दिसतं आहे. आज या ठिकाणी फडणवीस येणार असले तरी पंकजा आणि प्रीतम मुंडे या उपस्थित राहणार नाही. आजारी असल्याने पंकजा मुंडे यांनी गैरहजर राहणार आहेत. तर प्रीतम मुंडे देखील जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

एक जानेवारी रोजी देखील बीडमध्ये दिवंगत विनायक मेटे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला देखील दोघा बहिणींनी पाठ फिरवली होती. त्यामुळे आता या दोघींच्या अनुपस्थितीची चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या सोहळ्याला येणार होते. पण, व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांनी दौरा रद्द केला आहे.

दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी पंकजा मुंडे यांचं निमंत्रण पत्रिकेतून नाव वगळण्यात आले होते. तसेच, भाषणासाठी पंकजा मुंडेंना दोनच मिनीटे देण्यात आली होती. यामुळे नाराजीच्या चर्चांना उधाण आले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com