'अपप्रचाराचा भाजपा आणि महायुतीला फटका' पंकजा मुंडेंचं विधान

'अपप्रचाराचा भाजपा आणि महायुतीला फटका' पंकजा मुंडेंचं विधान

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'लोकशाही संवाद 2024' या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत
Published on

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'लोकशाही संवाद 2024' या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे या दखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांना आरक्षणाच्या मुद्दयावर प्रश्न विचरला असता 'अपप्रचाराचा नुकसान भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला भोगावे लागलं' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यांवर एकांकी प्रचार करण्यात आला आणि तुमचा पराभव हा राजकीय बळी ठरला का? असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, माझा पराभव हा राजकारणाचा एकमेव विषय नाही. ज्या पद्धतीने एक महिला लढते. कोणालाही अभाक्षर अभद्र काही न बोलता लढत आहे हे लोकांनी पाहिलं पण अपप्रचाराचा नुकसान भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला भोगावे लागलं.

मराठ्यांना पहिलं जे आरक्षण दिलं ते भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना मिळालं आणि नंतर जे निघालं ते अनेक कायद्याच्या चौकटीमधून निघालो. राजकारण विकासाभिमुख असावं अशी माझी भूमिका राहिली आहे.

मला असं वाटतं की ज्याला ही आरक्षण हवं आहे त्याचे मागासले पण सिद्ध करावे लागते. आणि त्याचे निकष आहेत ते फक्त आर्थिक निकष नाहीत. मागास असणं महत्त्वाचं आहे. जे जन्मतः आहेत त्यांना आर्थिक निकष नसतात.

ओबीसी समाजाच्या सुद्धा ऍक्टिव्हिटी लोक आपले मत आणि आपली भूमिका ठामपणे मांडत आहेत. कायद्याच्या चौकटीत नाही बसला तर आपण सगळे एकत्र बसून उपयोग नाही.

पुढे त्या म्हणल्या की, मला राजकारणात यायचं असं अजिबात डोक्यात नव्हतं पण परिस्थिती निर्णय घेतली. कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. मी गोपीनाथ मुंडे यांना सांगितले की मला राजकारण आता करायचे नाही तुम्ही दुसरा उमेदवार बघा आणि दोनच दिवसांनी बाबा गेले. आणि नंतर लोकांमुळे कार्यकर्त्यांमुळे मी पुन्हा राजकारणात आली आणि त्यांचीच होऊन गेली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com