Praful Patel
Praful Patel Team Lokshahi

'...नवीन असे काहीच नाही' राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष निवडीवर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया

सुप्रिा सुळेंनी आतापर्यंत राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर खूप चांगले काम केले आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 24 वा वर्धापन दिन आहे. याच वर्धापन दिनाचे मुहूर्त साधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षमध्ये महत्त्वाचा आणि मोठा बदल केला आहे. शरद पवारांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या नव्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवली आहे. यावरच आता प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Praful Patel
शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवारांचे ट्विट म्हणाले...

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

शरद पवारांनी पक्षाची कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, 'माझ्यासाठी नवी जबाबदारी येणे नवीन नाही. या गोष्टीचा आनंद नक्कीच आहे पण यामध्ये नवीन असे काहीच नाही.' मी सुरुवातीपासून राष्ट्रीय पातळीवर पक्षासाठी काम केलं आहे, तसेच माझ्यावर जी जबाबदारी दिली ती देखील मी पार पाडली आहे. असे ते म्हणाले.

पुढे त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या निवडीवर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 'ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यांनी आतापर्यंत राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर खूप चांगले काम केले आहे.' तसेच या विषयी कोणतीच पूर्वकल्पना नव्हती' असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com