PM Narendra Modi
PM Narendra ModiTeam Lokshahi

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर; जाणुन घ्या कशासाठी असेल हा दौरा?

वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदीलही दाखवणार आहेत.
Published by :
Sagar Pradhan
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. नुकताच 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौरा केला. त्यावेळी त्यांनी समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्पासह, मेट्रोचे लोकापर्ण केले. त्यानंतर आता 10 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी ते मुंबईत येणार आहेत. यावेळी ते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदीलही दाखवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते साईनगर शिर्डी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.

 PM Narendra Modi
उद्या होणार भारत आणि न्यूझीलंडमध्ये निर्णायक सामना; दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत

10 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी या दोन्ही गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता हा सोहळा सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या या उद्घाटन समारंभाला राज्यातील काही निवडक विद्यार्थ्यांना रेल्वेतर्फे निमंत्रण देखील देण्यात येणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर लगेच नियमित सेवा सुरु होणार आहे का? या बाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com