Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल; जाणून घ्या

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल; जाणून घ्या

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्काराच्या निमित्ताने १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे.
Published on

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्काराच्या निमित्ताने १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. कार्यक्रम शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला असल्याने बदल करण्यात येणार असल्याचं पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांची माहिती

१ ऑगस्टला सकाळी ६ वा. ते दुपारी ३ वा. दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येतील पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.

वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com