सोनिया गांधींच्या बुटाच्या लेस बांधताना दिसले राहुल गांधी; नेटकऱ्यांकडून कौतुक

सोनिया गांधींच्या बुटाच्या लेस बांधताना दिसले राहुल गांधी; नेटकऱ्यांकडून कौतुक

काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक येथे पोहोचली आहे. यात सोनिया गांधीही सहभागी झाल्या आहेत.
Published on

बंगळूरू : काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक येथे पोहोचली आहे. सोनिया गांधीही या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत. यामुळे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये अधिकच उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले. या दरम्यान राहुल गांधी कधी आईच्या खांद्यावर हात ठेवताना, तर कधी सोनिया गांधींच्या बुटाच्या लेस बांधताना दिसले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून युजर्स राहुल गांधींचे कौतुक करत आहेत.

सोनिया गांधींच्या बुटाच्या लेस बांधतानाचा राहुल गांधींचा फोटो शशी थरुर यांनी ट्विटरवर शेअर केला असून आई ही आई असते, तिला तोड नाहीच, असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो आता व्हायरल होत असून युजर्स राहुल गांधींचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. सोनिया गांधी भारत जोडो यात्रेअंतर्गत कर्नाटकातील पांडवपुरा ते नागमंगला तालुक्यापर्यंत जाणार आहेत.

दरम्यान, अध्यक्षपदावरून पक्षात गदारोळ सुरू असताना सोनिया गांधी काँग्रेसच्या पदयात्रेत सहभागी झाल्या आहेत. बऱ्याच दिवसांनी सोनिया एका कार्यक्रमात हजर झाल्या आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रचारही केला नव्हता. भारत जोडो यात्रा सुरू असताना सोनिया गांधी परदेशात उपचार घेत होत्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com