Raj Thackeray Birthday : राज की शर्मिला  कोणी केले प्रपोज? अशी आहे ठाकरेंची लव्हस्टोरी

Raj Thackeray Birthday : राज की शर्मिला कोणी केले प्रपोज? अशी आहे ठाकरेंची लव्हस्टोरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज 55 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राजकीय आयुष्याव्यतिरीक्त त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे.
Published on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज 55 वा वाढदिवस साजरा करत आहेत. दमदार भाषणशैली, आक्रमक म्हणून मनसे प्रमुख राज ठाकरे सर्वांनाच माहित आहे. राजकीय वर्तुळातही त्यांचे स्वतःचे असे वेगळे स्थान आहे. परंतु, राजकीय आयुष्याव्यतिरीक्त त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे लव्हमॅरेज आहे. याबाबत अनेकांना आश्चर्य वाटते. कॉलेज कट्यावरील ओळख आयुष्यभराची साथ झाली. राज ठाकरे आणि शर्मिला यांची लव्हस्टोरी फारच अनोखी आहे.

एका मुलाखतीदरम्यान राज व शर्मिला ठाकरे यांनी लव्हस्टोरीविषयी सांगितले होते. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची पहिली भेट ही रूपारेल कॉलेजच्या आवारात झाली होती. एका कॉमन फ्रेंडद्वारे राज आणि शर्मिला यांची भेट झाली होती. या भेटीनंतरच दोघांमध्ये संवाद सुरू झाला. त्यानंतर शर्मिला यांच्या प्रेमात पडलेले राज ठाकरे हे वारंवार फोन करत त्यांच्याशी गप्पा मारू लागले. लग्नासाठी मागणीही राज ठाकरेंनी घातली होती. शर्मिला ठाकरे या मराठी सिनेमा छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत.

राज ठाकरे यांचे काका बाळासाहेब ठाकरे आणि मोहन वाघ हे मित्र होते. यामुळे त्यांच्या लग्नामध्ये कोणताही अडथळा आला नाही. राज यांचे २२ व्या वर्षीच लग्न झाले होते. शर्मिला ठाकरे या राज ठाकरे यांच्यापेक्षा २ वर्षांनी मोठ्या आहेत. राज आणि शर्मिला ठाकरे ११ डिसेंबर १९९० मध्ये विवाहबध्द झाले. मुलगा अमित ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे अशी दोन मुले त्यांना असून आता यामध्ये सून मिताली बोरूडे आणि नातू कियान अमित ठाकरे यांचेही कुटुंबात स्वागत झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com