उद्धव ठाकरेंना सहानभूती मिळतीये हा भ्रम : राज ठाकरे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आगामी निवडणुक स्वबळावर लढण्याची घोषणा करताना तुम्हालाच सत्तेत बसवणार, मी बसणार नाही, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, राज्यात सध्या राजकारण खालच्या थराला जातं आहे. जे पेरलं जातंय ते तुमच्या डोक्यात जाता कामा नये. पुढील पाच महिने रात्रभर काम करा. मला पूर्ण विश्वास आहे की आपण सत्तेत पोहचू. तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेत नेणार मी स्वतः बसणार नाही, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
उध्दव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात लाखोंची गर्दी होती, असा दावा केला जात आहे. यावरही राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंना सहानभूती मिळतीये हा भ्रम आहे. ही कसली सहानभूती या लोकांनी जनतेशी प्रतारणा केली. वातावरण दाखवलं जातंय तसं नाही आहे. लाखो लोकांनी हे दसरे मेळावे पाहिलेसुद्धा नाही. अनेकांनी दसरे मेळावे पाहिले नाहीत, अशी टीकाही राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर केली आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या आधी मनसे आणि भाजप यांची युती होणार असल्याची चर्चा होती. परंतु, आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा आज राज ठाकरेंनी केली आहे. यामुळे चर्चांना पूर्णविराम मिळला आहे.