Atharva Salvi
Atharva Salvi

Atharva Salvi : राजन साळवी यांच्या मुलाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी यांना प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Atharva Salvi) राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी यांना प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर राजन साळवी यांच्या मुलाने भावनिक पत्र लिहिले असून हे पत्र सोशल मिडयावर व्हायरल झाले आहे.

अर्थव साळवी यांनी पत्रात म्हटलं आहे की, 'मी अथर्व राजन साळवी रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग १५ मधून आपल्यासाठी लढण्याची माझी मनापासून इच्छा होती. परंतु महायुतीच्या निर्णयामुळे मला या निवडणुकीतून बाजूला व्हावं लागत आहे. आणि हे सांगताना मन खरंच भारी होतंय. गेल्या काही दिवसांत माझ्या पाठीशी उभं राहिलेल्या सर्व ज्येष्ठांचे हात, मित्रपरिवाराची साथ, खांद्यावरची थाप देणं. हे सगळं विसरणं माझ्यासाठी शक्यच नाही. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास... हे माझं खरं बळ आहे.'

'नेतृत्व सोडत आहे पण लोकांची सेवा, तुमच्यासाठी धडपड आणि तुमच्या कामांसाठी धावपळ कधीच सोडणार नाही. निवडणूक नाही पण जबाबदारी तशीच आहे, आणि ती मी मनापासून निभावणार आहे. आपल्या प्रभागाचा विकास ही माझी वचनबद्धता आहे. पद असो वा नसो, माझा मार्ग तुम्हालाच सोबत घेऊन जाणार. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छितो -२४ तास, दिवस असो वा रात्र... कुठलीही अडचण आली तरी मी तुमच्यासाठी उभा आहे.'

'राजकारण बदलू शकतं. पदं येतात जातात पण नातं ? ते मात्र कायम राहतं - तुमचं आणि माझं. असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे. काल राजन साळवी यांच्या मुलाला शिवसेनेने रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली.' त्यांनी लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Summery

  • राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी यांना प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी नाकारण्यात आली

  • राजन साळवींचे पुत्र अर्थव साळवीचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

  • फेसबुकवरुन अर्थव साळवींनी रत्नागिरीकरांना लिहलं भावनिक पत्र

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com