Ramdas kadam On Uddhav Thackeray: " ठाकरे हे काळ्या जादूचे बादशहा'; रामदास कदम
वर्षा बंगल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला होता, त्यांच्या या प्रश्नावर महायुतीतील रामदास कदम आणि संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे काळ्या जादूचे बादशहा आहेत असं वक्तव्य रामदास कदम यांनी केल आहे. त्याचसोबत मंत्रा संजय शिरसाट यांनी देखील ठाकरेंवर निशाणा साधला आहे, ठाकरेंनी केलेली काळी जादू आम्ही पाहिली आहे. असं मंत्री शिरसाट म्हणाले आहे.
रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे हे काळ्या जादूचे बादशहा आहेत, ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, त्यावेळी वर्षा बंगलामध्ये एक टोकरी लिंबू भेटली होती.... त्यामुळे काळ्या जादूचे बादशाह उद्धव ठाकरे आहेत असा विधान रामदास कदम यांनी केला आहे. संजय राऊत आणि सामना कडून एकनाथ शिंदे यांची सातत्याने बदनामी केली जात आहे... त्यामुळे एकनाथ शिंदे संजय राऊत यांच्या विरोधात कोर्टात जाव असं देखील महत्त्वाच वक्तव्य रामदास कदम यांनी केल आहे.
याचपार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, ठाकरेंची काळी जादू आम्ही पाहिलेली आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा आम्ही काय काय सहन केले हे आम्हाल माहित आहे... तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा, देवेंद्र फडणवीस हे सगळं मानत नाही.... काही रेनोवेशनचे काम सुरु असते. रामदास कदम यांचं ही व्यक्तिक मत आहे आणि माझे ही व्यक्तिक मत होत... पण आता पक्षाची लाईन आहे, त्यामुळे आता माझे मत आहे की शिवसेना एकत्रित येणार नाही...