Bacchu Kadu Vs Ravi RanaTeam Lokshahi
राजकारण
'दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो' राणांची कडूंवर अप्रत्यक्ष टीका
कडू व राणा या दोघांकडूनही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात आमदार रवी राणा विरुद्ध आमदार बच्चू कडू असा वाद चांगलाच पेटला असल्याचं पाहायला मिळतंय. कडू व राणा या दोघांकडूनही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. तर, केलेले आरोप सिद्ध करू शकला नाहीत तर कायदेशी नोटीस पाठवू असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय. आता रवी राणा यांनी एक ट्वीट करून बच्चू कडू यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केलीये.
काय आहे ट्वीटमध्ये?
'दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला 'हा' एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला 'हा' फुसका फटाका आहे' असं ट्वीट राणा यांनी केलं आहे.
दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारमधील या अंतर्गत वादासंदर्भात आता सर्व राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे.