वैभव नाईक यांच्यासोबतच्या भेटीसंदर्भात रविंद्र चव्हाण म्हणाले...

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी घेतली मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट झाली.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी घेतली मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट झाली. नाईक व चव्हाण बंद दाराआड भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट झाल्यानं सिंधुदुर्गात चर्चा रंगल्या आहेत.

कणकवली रेस्ट हाऊसला या दोघांची भेट झाली. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी वैभव नाईक यांच्या भेटीसंदर्भात खुलासा केला आहे. याच पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण म्हणाले की, कुणाला पक्षात घ्यायचं असेल तरी देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांना विश्वासात घेऊनच पुढची पावले टाकली जातात.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारल्याशिवाय किंबहुना त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट आम्ही करत नाही. असे रवींद्र चव्हाण म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com