Rohit Pawar : लाडकी बहिण योजनेवरून रोहित पवारांची सरकारवर टीका; म्हणाले...
लाडकी बहिण योजनेवरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले की, लोकसभेचा निकाल बघितल्यानंतर हे घाबरलं. घाबरल्यानंतर स्वत:ची एखादी चांगली योजना आणण्यापेक्षा तशीच्या तशी मध्यप्रदेशची तुम्ही कॉपी करता म्हणजे आपलं राज्य हे अख्या देशाला तिथं दिशा देते. तिथे तुम्ही आता राज्यात कॉपी पेस्ट सुरु केलं. ही गोष्ट आम्हाला पटत नाही आणि अनेक अडचणी या महिलांना तिथे येतात म्हणून आम्ही कुठेतरी बोलतो.
आम्ही योजनेवर टीका करत नाही पण या सरकारवर टीका करतो आहे. अर्थकारण न बघता पैसा कसा देणार आहे, कुठून देणार आहे, कुठल्या विभागातून देणार आहेत. याचा अभ्यास न करता तुम्ही फक्त योजना जाहीर करता पण आमचं मत आहे.
योजना जाहीर केली तर ती पूर्णत्वास नेली पाहिजे. तीन महिने देतील मग बंद करतील. पण आपलं महाविकास आघाडी सरकार आलं तर आम्ही ही योजना पुढे नेणार चांगल्या पद्धतीने करुन व्याप्तीसुद्धा वाढवणार असे रोहित पवार म्हणाले.