...तर राज्य सरकारचं कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या; रोहित पवारांचा निशाणा

...तर राज्य सरकारचं कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या; रोहित पवारांचा निशाणा

राज्यात शासकीय भरती रखडलेली असताना आता राज्य सरकारनं कंत्राटी कामगारांच्या भरतीचा जीआर काढला आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे
Published on

मुंबई : राज्यात शासकीय भरती रखडलेली असताना आता राज्य सरकारनं कंत्राटी कामगारांच्या भरतीचा जीआर काढला आहे. खासगी नोकर भरतीसाठी तब्बल नऊ कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. अशातच, अजित पवारांनी एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील, असे विधान केले. या विधानाचा समाचार आता रोहित पवारांनीही घेतला आहे.

...तर राज्य सरकारचं कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या; रोहित पवारांचा निशाणा
फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे लव्ह-हेटचं नातं; कोण म्हणाले असं?

रोहित पवार म्हणाले की, एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकून व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या कोटी रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.

बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, शासन आपल्या दारीच्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची उधळमाप शासनाला चालते. मग नोकर भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज कंत्राटी भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकारप्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला कंत्राटी भरतीची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारचं कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या, असाही निशाणा रोहित पवारांनी साधला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com