निवडणूक आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांनी केला 'हा' फोटो ट्विट

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांनी केला 'हा' फोटो ट्विट

राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिसत आहेत. हा फोटो ट्विट करत त्यांनी जखमी वाघ अधिक धोकादायक असतो...! असं लिहिलं आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर रोहित पवारांनी केला 'हा' फोटो ट्विट
Aaditya Thackeray : EC म्हणजे 'Entirely Compromised'! तडजोड बहाद्दर!
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com