Rohit Pawar : महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणारं हे राज्यसरकार गुजरातला अजून काय काय देणार?

Rohit Pawar : महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणारं हे राज्यसरकार गुजरातला अजून काय काय देणार?

महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, गुजरातचे स्वामित्व घेण्यास महानंदला अखेर भाग पाडलेच. महानंदकडे असलेल्या मुंबईतील जमिनीवर डोळा असलेल्या दलालांनी महानंद जाणूनबुजुन तोट्यात आणत महानंदचा गेम केला. महाराष्ट्रात काय येईल याची गॅरंटी नाही पण महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणारं हे राज्यसरकार गुजरातला अजून काय काय देणार?

जमिनीच्या काही तुकड्यांसाठी D_फॉर_दलाली करणे राज्यकर्त्यांना शोभत नाही. स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणवून घेणारे आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे अनुयायी म्हणवून घेणारे आता भाजपच्या D_फॉर_दलालीवर आवाज उठवण्याची हिंमत दाखवतील का? असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com