Rohit Pawar
Rohit Pawar

Rohit Pawar : महाराष्ट्र हिताच्या प्रत्येक निर्णयात राजकीय भूमिका बाजूला ठेवून सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू

नव्या सरकारला दिल्या शुभेच्छा
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • काल महायुतीचा शपथविधी पार पडला

  • रोहित पवार यांच्याकडून पोस्ट करत अभिनंदन

  • नव्या सरकारला दिल्या शुभेच्छा

महायुतीचा शपथविधी सोहळा काल पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. महायुतीचा शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेबांचे तर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल मा.ना.श्री एकनाथ शिंदे साहेब व मा.ना.श्री.अजितदादा यांचे मनपूर्वक अभिनंदन.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, नवीन सरकार राज्याच्या हिताच्या मुद्द्यांना प्राथमिकता देऊन युवांना रोजगार, औद्योगिक गुंतवणूक, शेतकरी, महिला सुरक्षा या विषयांसाठी चांगले काम करेल हि अपेक्षा आहे. विरोधी पक्षात असलो तरी, आमची संख्या कमी असली तरी महाराष्ट्र हिताच्या प्रत्येक निर्णयात राजकीय भूमिका बाजूला ठेवून सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, परंतु महाराष्ट्र हित डावलणारा कुठला निर्णय घेतला जात असेल तर तेवढ्याच टोकाचा विरोध देखील करू. असो नव्या सरकारला खूप खूप शुभेच्छा. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com