Rupali Chakankar : रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत जाणार?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता अजून एक मोठी माहिती समोर येत आहे ती म्हणजे रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काल रात्री रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. रात्री उशिरा दोघांमध्ये भेट झाल्याची चर्चा रंगली आहे.
रूपाली चाकणकर या महिला आयोगाचे अध्यक्ष आहे. यापूर्वी राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य असलेल्या रूपाली चाकणकर यांच्यावर टीकेची जोड उठवली जायची. विशेषतः भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्याकडून रूपाली चाकणकर यांच्यावर नियमितपणे शाब्दिक हल्ले केले जात होते. आता रुपाली चाकणकर या अजित पवार यांच्या सोबत गेल्या तर त्यांच्या अडचणी कमी होऊ शकतात. असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत जाणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.